कुंडलिनी आणि श्री शिव शक्ती मुंबई, २४ डिसेंबर १९७९ शिव शक्ती आणि शिव यांचा अर्थ जर समजून घेतला तर त्यानी आपल्याला बराच फायदा होईल. कारण अजून शिवशक्तीचा मेळ शिवाशी झालेला नाही. जेव्हा हा मेळ घटित होतो तेव्हाच योग घडून येतो. शिव वेगळा शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून वावरत असतो. इथे म्हणजे त्याला क्षेत्रज्ञ म्हटले आहे, म्हणजे क्षेत्राला जाणणारा. आपल्यामध्ये कोणीतरी असा आहे जो आपण जे काही करत आहोत ते जाणत असतो. आपल्याला हे माहीत आहे. जरी आपण स्वत:ला ठगविण्याचा प्रयत्न केला, जरी आपण स्वत:बरोबर कितीही प्रतारणा केली तरी सुद्धा आपल्या हृदयात ते सगळं कोणीतरी जाणत आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याला जाणणारा जो शिव तो आपल्या हृदयात आत्मास्वरूप बसलेला आहे. जोपर्यंत शिवशक्तीचा आणि ह्या आत्म्याचा योग घडत नाही तोपर्यंत या दोन्ही शक्ती वेगळ्या समजल्या पाहिजेत. आता आत्म्याची जी शक्ती आहे ती म्हणजे साक्षिस्वरूप आहे, ती चिन्मय आहे, ती अनंत आहे. ती कधीही बिघडू शकत नाही. तिला तुम्ही मारू शकत नाही आत्मा हा निर्लेपात आहे. तो कशातही लपटत नाही. तो वेगळा असतो. तो सगळे काही बघत असतो. मी कधी कधी उदाहरण देत असते; गॅस लाइटरमध्ये एखादा लहानसा दिवा पेटत असतो किंवा एक ज्योत असते लहानशी. तशीच आपल्या हृदयामध्ये जी ज्योत आहे तो एक आत्मा आहे. ती तेवलेली ज्योत, ते ज्योतिर्मय जे जागृत, आहे तो आत्मा आहे. बाकी सुप्तावस्थेत आहे. म्हणजे त्यांच्यात अजून जागृती नाही आलेली. जागृतीचा अर्थ हात-पाय हलविणे नाही. जागृतीचा अर्थ आहे; आपला जो जागतिक स्वभाव आहे, जी सामूहिक चेतना आहे त्याला प्राप्त होणे. ज्याला अलख म्हणतात, ज्याला परोक्ष म्हणतात. ते आपल्या चित्तामध्ये जागृत होणे म्हणजेच जागृती येणे म्हणजे जशी गॅसमध्ये फ्लिकर असते म्हणजे एक लहानशी ज्योत जळत असते आणि त्याच्यामध्ये गॅसचा मोठा झोत जाऊन त्या ज्योतीला भिडतो तेव्हा सबंध गॅस एक मोठी गॅस लाईट होते अशा तऱ्हेने हे योगाचं घडते. पण हा जो गॅस आज नळ्यातून वाहत आहे त्याला आपण सुप्त म्हणू या कारण तो अजून प्रज्वलित झालेला नाही, म्हणून तो सुप्त आहे. प्रज्ज्वलित फक्त ती लहानशी ज्योत आहे आपल्या हृदयामध्ये आत्मास्वरूप ती जागृत आहे. बाकी सुप्तावस्थेत आहे. कुंडलिनी आपल्यामध्ये जी बसलेली आहे ती शिवशक्ती आहे. महाकालीची शुद्ध शक्ती आपल्या कुंडलिनीमध्ये बसलेली असते. इच्छा आपण वापरलेली नाही व शुद्ध स्वरूप आहे ती कुंडलिनीमध्ये बसलेली असते. जेव्हा ही कोणत्यातरी संयोगाने किंवा संकल्पाने जागृत होते, तेव्हा ती वर जाऊन सदाशिवाच्या स्थानाला भिडते. तेव्हा हृदयात बसलेल्या त्या आत्म्याला तो स्पार्क मिळतो आणि त्या स्पार्कमुळे ही शक्ती प्रज्वलित होते. तेव्हा शिव शक्ती जी आहे ती आत्म्याची शक्ती नव्हे, पण ती एका अर्थाने आत्म्याचीच शक्ती आहे. कारण सुरुवातीला जर आपण पाहिले, तर परमेश्वर आणि परमेश्वरी शक्ती ह्या दोन्ही एकच आहेत. सूर्य आणि सूर्याचे किरण किंवा चंद्र आणि चंद्राचे किरण हे दोन नाहीत. त्याचप्रमाणे परमेश्वर आणि त्याची शक्ती ह्या दोन वस्तू नाहीत. पण मानवाच्या बुद्धीला हे समजत नाही, की दोन वस्तू एकाकार आहेत, पण त्या आपल्या एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत कारण त्यांच्यामध्ये सृजन घडत आहे अन्यथा काहीही सृजन घडत नाही आणि पूर्णब्रह्म स्थापित होते तेव्हा सगळी सृजन क्रिया होते. ह्याच शिवशक्तीतून एकाकार कुंडलिनी आधी बनते. त्याच्यानंतर शिवशक्तीतूनच क्रियाशक्ती निघते. क्रियाशक्ती आणि शिवशक्तीच्या मेळानी, नंतर आपल्यामध्ये विष्णुशक्ती निघते. विष्णुशक्ती ही ज्ञानशक्ती आहे म्हणजे जे आपल्या जाणिवेत आले त्याला ज्ञान म्हटले पाहिजे. पुस्तकी ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. जेव्हा मनुष्य परमेश्वराच्या शोधात फिरतो तेव्हा म्हटलं पाहिजे की, त्याचं विष्णुतत्त्व पूर्णपणे जागृत झालेलं आहे. जर हे विष्णुतत्त्व त्याच्यात पूर्णपणे जागृत झालेलं नसेल तर सहजयोग जरा कमी प्रतीचा होतो. आता ही विष्णुशक्ती आपल्या सर्वांच्या पोटात आहे आणि विष्णुशक्तीनी धारणा होते. आपल्यामध्ये धर्माच्या इतक्या विकृत कल्पना आलेल्या आहेत, तशा त्या नसून अत्यंत शाश्वत आणि सनातन आहेत. त्या काही कल्पना नाहीत, पण वास्तविकता आहेत. म्हणजे कार्बनच्यात जर चार अणुभार आहेत तर त्या सर्व कार्बनला चारच अणुभार असणार जर सोन्याचा रंग पिवळा आहे आणि तो जर खराब होत नाही तर हा धर्म त्या सोन्याचा आहे. प्रत्येकाला आपला आपला धर्म मिळालेला आहे (विंचू, साप) तो विष्णुशक्ती म्हणून आहे. हा धर्म उजळत उजळत आज मानवस्थितीत आलेला आहे. मानवासाठी दहा धर्म सांगितलेले आहेत. ते दहा धर्म मानव असताना असायलाच पाहिजेत आणि ते जर नसेल, तर तो मनुष्य धर्मातून च्युत होतो. म्हणजे तो मानवच रहात नाही. एक तर तो राक्षस तरी होतो किंवा तो जनावर तरी होतो. मानव राहण्यासाठी ते दहा धर्म पोटात सांगितले आहेत. ही अगदी खरी गोष्ट आहे. आता दहा धर्माचे रक्षण करण्यासाठी एक दूसरी व्यवस्था परमेश्वराने करून ठेवली आहे, ती मानवाला समजत नाही, की आपण ह्या धर्मात राहिले पाहिजे. विष्णुशक्तीमुळे मानव होईपर्यंत स्वत: या संसारामध्ये अवतरण घेतलेलं आहे, आपल्याला माहीत आहे का, परमेश्वराचे अवतार झालेले आहेत, आधी आपण मासळी होता, तेव्हा मासळीरूपाने झालं आहे. मग कूर्मरूपाने (कासव) झालेले आहेत. कासवानंतर मग वराह रूपाने झालेले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला की स्पष्टरूपाने दिसून येते की, जशी जशी एका प्राण्याची प्रगती होत गेली तसा तसा परमेश्वराने स्वतः या संसारामध्ये जन्म घेतला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय मार्गदर्शन कोण करणार? आणि विष्णुशक्ती हीच फक्त अवतरण घेत असते. बाकीच्या कोणत्याही शक्त्या घेत नाहीत. त्याचं कारण असं आहे की अवतरणाची गरज उत्क्रांतीसाठी होत असते. आणि उत्क्रांतीसाठी जर आहे तर उत्क्रांतीचे कार्य हे विष्णुशक्तीमुळे होते. आणि विष्णुशक्तीच नेहमी अवतार घेत असते. त्यातल्या त्यात आपण जिला महाकालीची शक्ती म्हणतो किंवा जिला आपण शिवशक्ती म्हणतो ती सुद्धा अवतार घेते. जेव्हा भक्तावर काही संकटे येतात तेव्हा देवींनी अनेकदा ह्या संसारात येऊन म्हणून आपल्या छत्रछायेने त्या भक्तांना संरक्षण दिलेले आहे. तेव्हा ती सुद्धा अवतरण घेते. पण मुख्य अवतरण जे उत्क्रांतीला मदत करते ते म्हणजे विष्णुशक्तीचे आहे. आता विष्णुशक्तीचा जो पूर्णपणे प्रादर्भाव झालेला आहे, असं जे अवतरण आहे ते कृष्णाचे आहे. म्हणून त्याला संपूर्ण अवतरण असं म्हणतो. इतकंच नव्हे तर तो विराट आहे समजा जर हे विश्व विराटाचे आहे तर तुम्ही त्याच्यातले एक लहान पेशी आहात. ह्या पेशी आहेत, ह्या जागृत झाल्या पाहिजेत आणि ह्यांना कळलं पाहिजे की, ते एक संपूर्ण अवयव आहेत, भाग आहेत. आणि म्हणूनच आज इथे सहजयोग आपण करत आहोत. आता मनुष्य विशुद्धी चक्रापर्यंत आला. हे चक्र श्रीकृष्णाचे आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सोळा पाकळ्या त्याच्यात आहेत. आणि सोळा हजार नाड्या आहेत. त्या श्रीकृष्ण स्थितीला आल्यावर मानवाने आपलं डोकं वर केलं. त्याच्यातूनच मानव हा एक विशिष्ट तऱ्हेचा प्राणी झाला. आणि त्याचे वैशिष्ट्य हे की त्याला 'मी' पणा आला. मी म्हणजे अमूक. हे जे त्याचे प्रत्येक घटक वेगवेगळे करणे आहे, ह्या प्रत्येक घटकाला जे परमेश्वराने वेगळं करून टाकलेले आहे, ते एका विशेष क्रियेमुळे घडतं की, आपल्यामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार दोन्ही वाढले आणि जेव्हा ह्या ब्रह्मरंध्राच्या जवळची ही जागा आहे. इथे जेव्हां ते येऊन मिळतात आणि एकावर एक पडून जातात, तेव्हा तिथे स्वस्तिक संतुलन होते. जमा होते. जमा झाले की टाळू भरते. टाळू भरली म्हणजे तुम्ही सगळे वेगळे झालात. मग तुम्ही मानव झालात. अशा रीतीने आता हे जे अ, ब, क, ड सगळे लोक तयार झालेले आहेत, हे स्वत:ला वेगळे वेगळे समजतात. आम्ही वेगळे , तुम्ही वेगळे, ते वेगळे आहेत, पण खरोखर तुम्ही वेगळे नाहीत. तुमच्यात एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीला प्राप्त झाल्याशिवाय ते परत तुमच्या डोक्यात तरी कसे येणार? म्हणून परमेश्वराने तुम्हाला आधी वेगळे केलेले आहे. मानवाला मात्र परमेश्वराने स्वातंत्र्य दिले. तुम्हाला वेगळे केलेले आहे, की आता तुम्ही थोडे स्वत: शिका. स्वत: शिकल्यानंतर मगच तुम्ही जाणू शकाल, की तुम्ही त्या सबंधाचे एक अवयव आहात किंवा एक घटक आहात आणि हा जो घटक आहे तो जेव्हा जागृत होऊन त्याच्याशी एकाकार होईल तेव्हाच त्याला आपलं पूर्णत्व प्राप्त होणार आहे. त्यांनी माणसासाठी केलेले आहे आणि त्यासाठी, हे कार्य होण्यासाठी कुंडलिनी ही शक्ती, जी की शिवशक्ती स्वत:वर उठून ब्रह्मरंध्रातून छेदून वर येते, त्या वेळेला हा साक्षात्कार घटित होतो, ह्याला कोणताही दुसरा मार्ग नाही. कोणी जर सांगितलं की एकच मार्ग कसा? एकच मार्ग आहे. झाडाला अंकुर येणं हा एकच मार्ग आहे. तसाच मनुष्याची कुंडलिनी जागृत होणं हा एकच मार्ग आहे. आता इतर धर्मात याबद्दल सांगितलं आहे की नाही वगैरे पुष्कळ ऊहापोह होतात. पैकी तुम्ही जर ख्रिश्चन धर्म बघितला तर त्यांच्यात नाना तऱ्हेने कुंडलिनीचे वर्णन केलेले आहे. श्री ख्रिस्ताने असं म्हटलं आहे की, 'मी दरवाजा आहे' व 'मी रस्ता आहे' याचा अर्थ असा की श्री ख्रिस्त स्वत:च कुंडलिनीच्या मार्गातील दरवाजा आहे व रस्ता आहे. पण त्यांनी कुंडलिनी हा एक शब्द वापरला नाही;B नंतर मुसलमान धर्मामध्ये कुंडलिनीबद्दल म्हटलं आहे की नाही असं जर विचारलं तर मी म्हणेन सगळं कुंडलिनी तत्त्व आहे. नमाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पण कुंडलिनी वर कशी करायची हे त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. पूर्वी जेव्हा महंमदसाहेब होते तेव्हा त्यांनी सांगितले की आपले दोन्ही हात पसरून गुडघ्याच्या सहाय्याने तुम्ही नमाज करा. तेव्हा लोक हसत होते की हे कशाला करायचे. त्यांच्याशी कुंडलिनीच्या गोष्टी आजसुद्धा आपण करू शकत नाही. मग तेव्हाची तर गोष्ट वेगळीच. स्वत: ते महंमदसाहेब दत्तात्रयाचे अवतरणच होते. पण दत्तात्रयांची इथे काय स्थिती होती ते अगदी बघण्यासारखे आहे. म्हणून त्या लोकांनी समजून घेतलं नाही. तरीसुद्धा त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जरा मुसलमानांचे नमाज पहा. आता नमाजचे जेवढे काही प्रकार आहेत ते सबंध चक्रांना गती देणारे आणखी कुंडलिनी जागृत करणारे आहेत. तर ही जी दुसरी शक्ती आहे, विष्णुशक्तीच्या रूपाने आपल्यामध्ये वास करत असते त्याला हे जे गुरू लोक आहेत, म्हणजे दत्तात्रयाचे जे रूप आहे ज्यांना आपल्या महाराष्ट्रात आपण फारच मान देतो, हे सगळे पोटामध्ये विराजित आहेत. त्याची तत्त्वे झाली पाहिजेत. पुष्कळ लोक जागृत दत्तात्रयाचे भक्त आहेत. पण सगळ्यांची पोटं खराब आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही दत्तात्रयांचे शिष्य म्हणजेच तुमचे पोट अत्यंत उत्तम असायला पाहिजे तर तुमचे पोटच खराब असणार. दत्तात्रयाला आळवायला बसले. दत्तात्रय काय घरातले नोकर नाही. दत्तात्रय म्हणजे काय ? ते आम्हाला माहीत आहे, म्हणून त्याचे वर्णन देखील आम्ही करू तुमच्या शकत नाही. तेव्हा एवढ्या मोठ्या तत्त्वाला तुम्ही आवाहन करता, त्याच्यासाठी तुमची तयारी आहे कां? परत तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? ही अनाधिकार चेष्टा केल्यामुळे गुरूसुद्धा ह्याच्यात भामटे बसवले आहेत, पुष्कळसे गुरू नुसते भामटे आहेत. त्यांना दत्तात्रयाचे नावसुद्धा घ्यायचा मुळीच अधिकार नाही. परत ते असे सर्व अनाधिकारी गुरू दुर्गतीला जातात, पण तुम्हालाही मात्र दुर्गतीकर त्यांनी येते आणि अशा रीतीने तुम्ही जे दत्तात्रयांचे तत्त्व स्वत:मध्ये जागृत करायचे ठरविले, त्यामध्ये अत्यंत दोष आहेत. आणि ह्या दोषांमुळे पोटामध्ये त्रास वरगैरे होतात. आता सहजयोगानंतर तुमच्या लक्षात येईल की काय दोष आहेत ? त्याचं अद्वैत कसं साधायचं? आणि कशा रीतीने आपल्यातले दत्रात्रेय जागृत करून घ्यायचे. एकदा दत्तात्रेय आपल्यामध्ये जागृत झाले की मग धर्म आपोआप बसतो. अधर्म करणे मोठे कठीण जाते. आता मुख्य म्हणजे ह्या गुरू लोकांनी काय सांगितलेले आहे, ते आपण लक्षात घ्या. पहिली मुख्य गोष्ट म्हणजे मानवाला कोणतीही नशेची गोष्ट नसावी. कोणी म्हणतात की साईनाथ चिलीम पीत होते. अहो, ते तुमच्या नशा घालविण्यासाठी पीत होते. त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही नशा करायची नाही. कोणतीही नशेची गोष्ट, मग ती तंबाखू असो किंवा दारू असो, त्याच्या विरोधात सदैव आता दारू का प्यायची नाही? त्यांनीच आपल्या धर्माला किंवा गुरूतत्त्वाला त्रास होतो. विष्णुतत्त्वाला पोषक हे गुरू आहेत. परत कट्टरपणा धर्मांधता ह्या सर्व गोष्टी आपल्या नाभी चक्राला नुकसानकारक ठरतात. आता आपल्यामध्ये जर कट्टर लोक असतील तर हमखास त्यांना पोटाचा त्रास होईल. कट्टरतेने त्यांना भयंकर पोटाचा त्रास होणार आहे. कारण कट्टरता ही विष्णुतत्त्वाला फार हानीकारक आहे. इतकेच नव्हे तर गुरूतत्त्वसुद्धा त्यांच्यामध्ये नुकसान पावते, म्हणून ज्या माणसामध्ये कट्टरता आहे म्हणजे आम्ही मोठे लागून आलो. हिंदू किंवा ब्राह्मण, ख्रिश्चन किंवा मुसलमान, असे कट्टर म्हणवणारे लोक सहजयोगाला पावू शकत नाहीत. तुम्हाला काय माहीत? तुम्ही आज इथे जन्माला आलात, उद्या मुसलमान धर्मात आला असता तर, किंवा चायनामध्ये जन्माला आला असता तर? कशावरून तुम्ही ठरवलत तुम्ही हेच आहात म्हणून? हिंदुस्थानात तरी तुम्ही असे म्हणू शकत नाही. भारतीय असून, हिंदू असून म्हणू शकत नाही कारण सांगितलेले आहे की, तुमचे पुनर्जन्म आहेत. जर तुमचे पनुर्जन्म आहेत तर तुम्ही पूर्वजन्मी कोण होता काय माहिती? कदाचित पूर्वजन्मी तुम्ही इंग्रज असाल आणि जे इथे मोठे साधुसंत ते आता इंग्रज म्हणून जन्माला आले असतील आणि तिथूनच एखादे वेळेला तुम्ही इथे आला असाल. आजकालचे पुढारी पाहिले की, मला अशी शंका वाटू लागते की, ते इथे आलेत की काय जन्माला? आणि त्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे की, आपण धर्माबद्दल बोलतो, तेव्हा बाह्य धर्मापेक्षा आतल्या धर्माकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याची अनेक उदाहरणे आपल्यामध्ये दाखविण्यासाठी आहेत. विशेषतः आपल्या अवतरणांनी दाखविले आहे. उदाहरणार्थ रामाचेच घ्या की एक भिल्लीण, तिचे दात तुटलेले, म्हातारी, अंघोळीला वंचित झालेली, दात घासले नसतील, अगदी म्हातारी जख्खड बाई. तिने बोरे फोडली आणि तोंडात घालून उष्टी केली. तुम्ही एकतरी खाल का? विशेषत: आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर फारच वावडे उष्ट्याचे. पण इतक्या प्रेमाने रामानी ती खाल्ली. सीतेला म्हणाले की, 'मी तुला एकही देणार नाही. सगळी मीच खाणार आहे. ' तिने म्हटलं, 'असं काय, सगळी आपणच खाणार.' मी म्हणे अशी बोरं कधी खाल्लीच नाही, मला अशी चव कधी आलीच नाही, तर मी हे का तुला देऊ? तर मग ती भिल्लीण म्हणते, 'नाही, नाही, माझ्याजवळ आहेत न तुमच्यासाठी, पण मी दातांनी तोडून ठेवलेली आहेत.' मग त्यांना दिली मग लक्ष्मणाला राग येत होता की हा काय प्रकार आहे ? त्याला नाही समजलं, हा काय प्रकार ? सीतेने सांगितले खरं आहे, मी कधी जन्मात अशी बोरं खाल्ली नाहीत. थोडी असली तर मला द्या. माझ्या दिराला पण द्या. मग अगदी धावून लक्ष्मणाने घेतली ती बोरं असं सुंदर वर्णन केलंय. विदुराच्या घरी जाऊन जेवले श्रीकृष्ण. स्वत: गवळी जातीत त्यांनी जन्म घेतलेला होता. मग आम्ही कोणीतरी मोठे शिष्ट आहोत, असं मानायचं म्हणजे तुम्हाला हिंदूधर्म मुळातून अगदी समजला नाही, हे दिसून येते. सर्व माणसामध्ये एकच आत्मा आहे. आणि सर्व माणसे एकाच आत्म्याच्या भोवती फिरत आहेत. एकच परमेश्वर सगळ्यांच्यामध्ये नांदतो, हे अनेकदा जरी सांगितलं असलं तरी आपण जाती-पाती करून ठेवल्या आहेत. जाती- पाती ह्या मनुष्याच्या स्वभावामुळे असतात आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो तेव्हा ही फार आतली गोष्ट आहे. 'स्व' भाव त्या 'स्व' ला अजून जाणलं नाही. तुम्ही जाती कशा कराल ? अशाच प्रकारे हे आपल्यामधील विष्णुतत्त्व खराब होते. म्हणजे आधीपासून आपल्या कल्पना करून घ्यायच्या की हे ठीक नाही ते ठीक नाही, तुम्हाला कसं कळलं? हे कसं तुम्ही ओळखणार? त्याच्यासाठी आधी तुमच्यामध्ये विष्णुतत्त्व जागृत व्हायला पाहिजे. ते तुमच्या नाभीचक्रात आहे. नाभी चक्रातलं विष्णुतत्त्व जर जागृत झालं तर त्याच्यापुढे स्वाधिष्ठान चक्रावरती मी आपल्याला काय सांगितलेले आहे की ही क्रियाशक्ती स्वाधिष्ठान चक्रावर चाललेली आहे. तेव्हा ज्या लोकांना अती कर्म करायची सवय लागलेली असते त्या लोकांना स्वाधिष्ठान चक्राचा फार जास्त त्रास होतो. कारण सगळी शक्ती विष्णुतत्त्वातून ती स्वाधिष्ठान चक्रात ओढत असतात. जो अतिकर्मी मनुष्य असतो त्याला वेळच नसतो की माझी उत्क्रांती झाली पाहिजे, की मी काहीतरी करून , माझ्यातून विशेष निघालं पाहिजे. मला काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. त्याचा तिकडे विचारच नसतो. सगळा वेळ तो आपली परमेश्वराने दिलेली जी शक्ती आहे ती ओढत असतो. आणि म्हणूनच आपण पाहिलेले आहे की अशा लोकांना सारखे वरचेवर रोग होतात. आता ही शक्ती विष्णुशक्ती आणि शिवशक्ती आहे तर विष्णुशक्तीतूनच ही सहा चक्र वरती निघालेली आहेत. आणि ह्या सहा चक्रांमधून म्हणजे स्वाधिष्ठान चक्रसुद्धा विष्णुशक्तीतूनच निघालेले आहे. जेव्हा ही कुंडलिनी हे सर्व छेदून वर जाते तेव्हा ती संपूर्ण शुद्ध विद्या म्हटली पाहिजे. किंवा जे शुद्ध तत्त्व आहे, परमेश्वराच्या इच्छेने ते त्याच्यातून छेदून जातांना जागृत करून जाते . म्हणजे आपल्यामध्ये बसलेले जे काही सुप्त देव आहेत जे अजून प्रज्वलित झालेले, ते जागृत होतात. ते जागृत झाल्याबरोबरच ह्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतात. लक्ष्मीतत्त्व जागृत झाल्याबरोबरच आपल्याला माहीत आहे की, लक्ष्मीचे काय अंग असते ते. लक्ष्मी म्हणजे अती श्रीमंत मनुष्य नाही. पैसेवाला नाही. लक्ष्मी म्हणजे एका हातातून दान असायला पाहिजे. एका हातातून आश्रय असायला पाहिजे. दोन हातामध्ये कमळ असायला पाहिजे. जो कंजूष आणि कद्रू मनुष्य आहे तो लक्ष्मी तत्त्वाला मुळीच अजून प्राप्त झालेला नाही. जो मनुष्य कमळासारखा अत्यंत प्रेमळ आणि ज्याच्या घरी कोणीही जावे. म्हणजे इतका की भुंगा इतका काटेवाला तो जरी आला तरी कमळ त्याला कसं अगदी सांभाळून घेतं, असा जो करील तोच मनुष्य आपल्याकडे खरा लक्ष्मीपती मानला जातो, पण आपल्याकडे असे किती लक्ष्मीपती आहेत ? नाहीतच म्हटलं तरी चालेल. लक्ष्मीपती ज्यांना आपण म्हणतो ते खरं म्हणजे जे खूप पैसेवाले आहेत, गाढवावर पैसे लादावेत अशा तऱ्हेचे लोक आणि अशा लोकांना काहीही धर्म कधी मिळणार नाही. श्री.ख़िस्तांनी सांगितले आहे, की ज्या माणसाजवळ अती पैसा आहे, तो कधीही प्रभूच्या साम्राज्यात येऊ शकत नाही. एक वेळेला एक उंट तुम्ही घातला एका सुईच्या भोकातून तो जाऊ शकेल, पण असा मनुष्य जाऊ शकत नाही. त्याला कारण हे की अशा माणसाला सगळा पैसाच दिसतो. दसरं काहीच दिसत नाही. आपले आईवडील दिसत नाहीत, भाऊबहिणी दिसत नाहीत, बायको दिसत नाही. काही दिसत नाही. मी किती मोठा, माझ्याजवळ एवढा पैसा आहे, पण एकदा तो पैसा हरवला की मग त्याच्या लक्षात येतं, की तो कुठे गेला. अती पैशाचे पण आपल्याला माहीत आहे, की त्यामुळे मनुष्याला थेरं सुचतात, की तो आता कुठे खर्च करायचा? जरी पैसा जेमतेम असला, तरी ज्यांनी आपल्याला समाधान मिळतं ती विष्णुशक्ती जर आपल्यामध्ये जागृत झाली, तरच मनुष्याची पुढे प्रगती होऊ शकते. म्हणजे त्याचे चित्त पैशाहन समाधानावर आल्यावरती मग तो पुढच्या मार्गाला लागतो. पण समाधानच जर पैशातून आलं नाही, म्हणजे असं आहे, की आम्हाला वाटलं एक घर बांधावं तर घर बांधू, घर बांधल्यावरती मग वाटेल की आता मोटर घ्यावी, मग आम्ही मोटर घेऊ. मोटर घेतल्यावरती आम्हाला वाटेल बिल्डिंग घ्यावी. काहीतरी सारखं चालत राहणार. म्हणजे कधीही आपल्याला समाधान नाही मिळणार. पण हे जडत्व, स्थूल आहे. ही वस्तू आहे. त्या वस्तूपासून मानवाला कधीही समाधान होणार नाही. ही जड वस्तू आहे. जडतेने आपल्याला फक्त जडता येते. जडतेने समाधान येऊ शकत नाही. समजा एखाद्याला खु्चीची सवय झाली मग जमिनीवर बसू शकत नाही, म्हणजे खुर्ची चिकटली त्याला. म्हणजे सर्व जडता आहे जी माणसाला सवय लावते. कोणत्याही गोष्टीची सवय जी जडतेची लागते. तर त्या सवयीमध्ये माणूस हळूहळू विरघळून त्याचे जे काही सत्त्व आहे ते नष्ट होते. कोणत्याही जड वस्तूनी माणसाला समाधान मिळू शकत नाही. फक्त परमेश्वरी तत्त्वानेच येऊ शकते. जोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्यातून प्लावीत होत नाही, प्रस्फुटीत होत नाही, स्तंभीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान कधीही मिळणार नाही. तुम्ही वाटेल तितके पैसे कमवून बघा, वाटेल त्या सत्तेवर तुम्ही जाऊन बघा, पण तरी तुमचा चेहरा नेहमी सुतकीच राहील. पण असा एखादा बादशहा मनुष्य की जो काहीही नसतांना मजेत असतो. कुठे झोपवलं तरी मजेत असतो. अशा माणसाला पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की ही जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये तृप्त झाली आहे. आता काहीतरी पुढचे पाहिले पाहिजे. आता काहीतरी दुसरं असायला पाहिजे. हे जे झाले हे समाधान झाले. फार झालं आता. आता आणखी नको हे प्रपंच फार झालेत, आता ह्याच्यापुढची पायरी काय? तर तेव्हा मनुष्य धार्मिकतेला जागृत होतो मग त्याच्यातही मनुष्याचे डोके बाहेर येते. पहिले एक ब्राह्मण बोलवायचा, मी तुला दोन पैसे देतो, तू पूजा कर. प्राप्ती लावायची किंवा फार तर एखाद्या देवळाला शे-पाचशे रुपयांची देणगी दिली. वा, वा आम्ही देणगी दिली. नाहीतर एक देऊळ बांधून टाकायला हरकत नाही. ह्या देवळाचं काय होणार आहे ? तुमच्या देवळाची काय स्थिती आहे ? इकडे आहेत की नाही देव स्वत: मध्ये? इथले देव तुम्ही जागृत केलेत की नाही? तुमच्यामध्येच बसलेला आत्मा आहे. मग तुम्ही त्याला का नाही जागृत करत ? कारण असं आहे, की माणसाला स्वत:ला बघायचं म्हणजे मोठा त्रास. तो स्वत:ला बघू शकत नाही. आणि त्याच्यासाठी कुंडलिनीची व्यवस्था आहे. ही कुंडलिनी एकदम उठते आणि वर येते ते का ? सगळेच्या सगळे देव जागृत होतात. आता पुष्कळांना असं वाटतं की, कुंडलिनी जागरण म्हणजे मोठं कठीण काम आहे. पण तसं नाही आपण आता पाहिलतच. किती सोपं आहे. काल किती लोकांना पार केलं? काल किती लोकांच्या हाताला थंड लहरी 'सौंदर्य लहरी' आल्यात. हे अत्यंत सोपं काम आहे. पण हे ज्याला जमतं तोच करू शकतो. ज्याला हे जमत नाही त्यांनी त्याच्यात पडू नये. अधिकार चेष्टा करू नये. ज्याला ह्याचा अधिकार आहे, त्याच्यासाठी ही सबंध लीला आहे आणि जेवढं काही महत्त्वपूर्ण आहे, तेवढं सोपं असायला पाहिजे. तर आता ही जी शिवशक्ती तुमच्यामध्ये डावीकडे आहे, ही शिवशक्ती सदाशिवाच्या आणि आपल्या इथे सुद्धा विराजित आहे असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये आत्मा आणि शिवशक्ती दोन्ही आहेत. त्या स्थितीमध्ये. तिथे जेव्हा जाऊन ही कुंडलिनी ब्रह्मरंध्राला छेदते, तेव्हा तो प्रकाश सगळीकडे पडतो आणि तुम्ही एका नवीनच अवस्थेमध्ये उतरता. एका नवीन आयामात उतरता. तुमच्या चेतनेला एक नवीन रूप मिळते. म्हणजे तुमच्या चेतनेमध्ये एक प्रज्वलितपणा येतो. 'प्र' शब्द जो आहे तो ह्याच्यात बरोबर वापरण्यासारखा आहे. 'प्र' म्हणजे प्रकाशित झालेला . आत एक दीप आहे. तो पेटलेला नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. तो पेटवल्याबरोबरच तो प्रज्वलित झाला तसेच तुमचे चित्त आहे ते प्रज्वलित होते त्यामुळे प्रकाश पडतो. प्रकाशामुळेच तुम्हाला सगळं दिसायला लागतं. आता तुम्हाला काही दिसत नाही अलख आहे, अपरोक्ष आहे, वगैरे-वगैरे लोक बोलतात आणि त्यामुळे तुम्हाला समजत नाही. ह्याला इलाज काय? इलाज आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्काराशिवाय तुमची अविद्या जाणार नाही आणि ते हे घटीत झालंच पाहिजे. ते परमेश्वराचे कार्य आहे. त्यांना हे कार्य करायलाच पाहिजे. त्यांनी हे संसाराचे सुंदर स्वप्न रचलेलं आहे. आणि त्यांची ही रचना जर फलद्रप झाली नाही तर परमेश्वरालाच अर्थ राहणार नाही. तेव्हा त्यांना हे कार्य करावे लागेल आणि ते कसं करायचं ते त्यांना माहीत आहे. पुष्कळसे लोक म्हणतात-'आम्ही माताजी शिवजीचे भक्त' त्यामुळे हृदयाचा त्रास त्यांना. अगदी खरी गोष्ट आहे की, शिवाचे भक्त म्हणजे नक्कीच हृदयविकार ! अनाधिकार चेष्टा केल्यामुळे जर शिवशक्ती रागावली तर शिवशक्ती जी आहे, ती तुमच्या अस्तित्वाला कारणीभूत आहे. तुमचे अस्तित्वच नष्ट होणार. म्हणून तुमच्या हृदयाचा त्रास पण त्याला पर्याय आहे. तर काय करायचं? क्षमा मागायची. शिवाकडे आपण क्षमा मागितली पाहिजे. फार सोपी गोष्ट आहे. शिवाला सांगायचं आमचं चुकलं, तू करुणासागर आहेस, दया सागर आहेस. तू आम्हाला क्षमा कर. आता आम्ही नीटपणाने चालणार आहोत. इथून तिथून या महाराष्ट्रात इतके गुरू आहेत, त्यातले फार तर दोन चार खरे गुरू झालेले आहेत. बाकी सगळे अगदी भामटे आहेत. आणि त्यांचे मारे फोटो घरात ठेवलेले आहेत. आणि सांगून ठेवते आता कलीयुग संपलेले आहे आणि सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे. त्या गुरूंच्यामुळे तुम्हाला ल्युकेमियाचा, कॅन्सरचा रोग होणार आहे आणि सहजयोगाशिवाय हा ठीक होणार नाही आणि त्यामुळे आता लक्षात ठेवा. जर तुम्ही अशा गुरूंची आणि घाणेरड्या लोकांची सेवा केली, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे एक आईच्या प्रेमाने अत्यंत आतून करुणेने सागंत आहे. सहजयोगाने तुमच्यात प्रकाश येईलच. आणि त्या प्रकाशाने तुम्ही जाणणार की, बाहेर किती खोटे काम चाललेले आहे. आणि हा खोटेपणा किती बळावलेला आहे. या धर्मांधतेने आणि अशा रीतीच्या देवळात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन काय आपलं आयुष्य अगदी बरबाद करून घेत आहेत. त्याला काहीतरी मार्ग द्या, त्याला काहीतरी प्रकाश द्या. हे मानवाचे शरीर तुम्हाला माहीत नाही, परमेश्वराने किती मेहनतीने बनवले आहे. कितीतरी योनीतून तुम्हाला काढून या स्थितीत आणलेलं आहे तेव्हा ही स्वतंत्रता आपण वापरली पाहिजे. आपण कोण आहोत? परमेश्वराने आपल्याला कोणत्या स्थितीतून इथे आणलंय? किती प्रेमाने, किती संगोपन करून आज आपली त्यांनी इतकी सुंदर स्थिती केलेली आहे. ह्या इतक्या सुंदर झालेल्या आपल्या मानव देहाला, आपल्या मनाला आणि ह्या सबंध मानव व्यक्तित्वाला कोणकोणत्या स्थितीला आणलंय. कुूठे बसवलेले आहे ह्याचा विचार करावा. स्वत:ची मान्यता झाली पाहिजे. एक बाणा असायला पाहिजे माणसामध्ये समजण्याचा की, आम्ही कोण? कुठे जाणार? आम्हाला काय हवंय ? तेव्हा तुम्ही आपले या आणि स्वत:चं कल्याण करून घ्या. त्या गुरूंच्या मागे उगीचरच तुम्ही स्वत:ला त्रास करून घेऊ नका. आणि 'स्व' ला प्राप्त झाल्यानंतर ह्या गुरूपासून कशी सुटका करायची ते शिकून घ्या. पण त्यांच्याशी वाद घालायला जाऊ नका. भांडायला जाऊ नका. ते तुमच्या हृदयात वसत नाही. ते तुम्हाला जमायचं नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि तिथे जरी तुम्ही कितीही बलवत्तर असाल, पण तरीसुद्धा हे लोक अत्यंत दष्ट असतात आणि त्यांच्यात इतक्या घाणेरड्या विद्या असतात आणि इतके पतित असतात! तेव्हा मला वारंवार सांगायचय की, अशा लोकांच्या मागे तुम्ही जरी गेले असाल तरी सहजतेतच तुम्ही त्यांना सोडलं पाहिजे. जर तुम्ही ते सहजतेत सोडून दिलं तर त्यानी फारच लाभ होण्यासारखे आहे. कधी कधी या गुरूचे प्रकार बघून मला इतका त्रागा वाटतो, इतका क्रोध येतो की, कधी कधी वाटतं जर संहार शक्ती वापरली तर याचा सहज संहार परमेश्वर करू शकतो पण संहार करून तरी काय करणार ? कारण कलीयुगामध्ये अशी स्थिती आहेच आहे की, 'यदायदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत' झालेला आहे. परंतु ह्या जगामध्ये असे साधू कोण आहेत ? 'परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्' दुष्कृतांच मुख्य आहे, साधूंमध्ये तेव्हा ह्यांच्या डोक्यात घुसलेले आधी काढायला हवे, तेव्हाच त्यांना पार करता येईल. अत्यंत नाजूक स्थिती आहे. मला दिसतयं की तुमच्या दुष्कृत्य मेंदमध्येच ते घुसलेले आहे. तेव्हा काढायला पाहिजे. ते स्वच्छ करायला पाहिजे. ते व्यवस्थित काढून तुम्हाला तुमच्या ठिकाणी द्यायचंय आणि तुमची जी संपदा आहे ती तुमच्यात बसवायची आहे. ---------------------- 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page0.txt कुंडलिनी आणि श्री शिव शक्ती मुंबई, २४ डिसेंबर १९७९ शिव शक्ती आणि शिव यांचा अर्थ जर समजून घेतला तर त्यानी आपल्याला बराच फायदा होईल. कारण अजून शिवशक्तीचा मेळ शिवाशी झालेला नाही. जेव्हा हा मेळ घटित होतो तेव्हाच योग घडून येतो. शिव वेगळा शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून वावरत असतो. इथे म्हणजे त्याला क्षेत्रज्ञ म्हटले आहे, म्हणजे क्षेत्राला जाणणारा. आपल्यामध्ये कोणीतरी असा आहे जो आपण जे काही करत आहोत ते जाणत असतो. आपल्याला हे माहीत आहे. जरी आपण स्वत:ला ठगविण्याचा प्रयत्न केला, जरी आपण स्वत:बरोबर कितीही प्रतारणा केली तरी सुद्धा आपल्या हृदयात ते सगळं कोणीतरी जाणत आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याला जाणणारा जो शिव तो आपल्या हृदयात आत्मास्वरूप बसलेला आहे. जोपर्यंत शिवशक्तीचा आणि ह्या आत्म्याचा योग घडत नाही तोपर्यंत या दोन्ही शक्ती वेगळ्या समजल्या पाहिजेत. आता आत्म्याची जी शक्ती आहे ती म्हणजे साक्षिस्वरूप आहे, ती चिन्मय आहे, ती अनंत आहे. ती कधीही बिघडू शकत नाही. तिला तुम्ही मारू शकत नाही आत्मा हा निर्लेपात आहे. तो कशातही लपटत नाही. तो वेगळा असतो. तो सगळे काही बघत असतो. मी कधी कधी उदाहरण देत असते; गॅस लाइटरमध्ये एखादा लहानसा दिवा पेटत असतो किंवा एक ज्योत असते लहानशी. तशीच आपल्या हृदयामध्ये जी ज्योत आहे तो एक आत्मा आहे. ती तेवलेली ज्योत, ते ज्योतिर्मय जे जागृत, आहे तो आत्मा आहे. बाकी सुप्तावस्थेत आहे. म्हणजे त्यांच्यात अजून जागृती नाही आलेली. जागृतीचा अर्थ हात-पाय हलविणे नाही. जागृतीचा अर्थ आहे; आपला जो जागतिक स्वभाव आहे, जी सामूहिक चेतना आहे त्याला प्राप्त होणे. ज्याला अलख म्हणतात, ज्याला परोक्ष म्हणतात. ते आपल्या चित्तामध्ये जागृत होणे म्हणजेच जागृती येणे म्हणजे जशी गॅसमध्ये फ्लिकर असते म्हणजे एक लहानशी ज्योत जळत असते आणि त्याच्यामध्ये गॅसचा मोठा झोत जाऊन त्या ज्योतीला भिडतो तेव्हा सबंध गॅस एक मोठी गॅस लाईट होते अशा तऱ्हेने हे योगाचं घडते. पण हा जो गॅस आज नळ्यातून वाहत आहे त्याला आपण सुप्त म्हणू या कारण तो अजून प्रज्वलित झालेला नाही, म्हणून तो सुप्त आहे. प्रज्ज्वलित फक्त ती लहानशी ज्योत आहे आपल्या हृदयामध्ये आत्मास्वरूप ती जागृत आहे. बाकी सुप्तावस्थेत आहे. कुंडलिनी आपल्यामध्ये जी बसलेली आहे ती शिवशक्ती आहे. महाकालीची शुद्ध शक्ती आपल्या कुंडलिनीमध्ये बसलेली असते. इच्छा आपण वापरलेली नाही व शुद्ध स्वरूप आहे ती कुंडलिनीमध्ये बसलेली असते. जेव्हा ही कोणत्यातरी संयोगाने किंवा संकल्पाने जागृत होते, तेव्हा ती वर जाऊन सदाशिवाच्या स्थानाला भिडते. तेव्हा हृदयात बसलेल्या त्या आत्म्याला तो स्पार्क मिळतो आणि त्या स्पार्कमुळे ही शक्ती प्रज्वलित होते. तेव्हा शिव शक्ती जी आहे ती आत्म्याची शक्ती नव्हे, पण ती एका अर्थाने आत्म्याचीच शक्ती आहे. कारण सुरुवातीला जर आपण पाहिले, तर परमेश्वर आणि परमेश्वरी शक्ती ह्या दोन्ही एकच आहेत. सूर्य आणि सूर्याचे किरण किंवा चंद्र आणि चंद्राचे किरण हे दोन नाहीत. त्याचप्रमाणे परमेश्वर आणि त्याची शक्ती ह्या दोन वस्तू नाहीत. पण मानवाच्या बुद्धीला हे समजत नाही, की दोन वस्तू एकाकार आहेत, पण त्या आपल्या एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत कारण त्यांच्यामध्ये सृजन घडत आहे अन्यथा काहीही सृजन घडत नाही आणि पूर्णब्रह्म स्थापित होते तेव्हा सगळी सृजन क्रिया होते. ह्याच शिवशक्तीतून एकाकार कुंडलिनी आधी बनते. त्याच्यानंतर शिवशक्तीतूनच क्रियाशक्ती निघते. क्रियाशक्ती आणि शिवशक्तीच्या मेळानी, नंतर आपल्यामध्ये विष्णुशक्ती निघते. विष्णुशक्ती ही ज्ञानशक्ती आहे म्हणजे जे आपल्या जाणिवेत आले त्याला ज्ञान म्हटले पाहिजे. पुस्तकी ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. जेव्हा मनुष्य परमेश्वराच्या शोधात फिरतो तेव्हा म्हटलं पाहिजे की, त्याचं विष्णुतत्त्व पूर्णपणे जागृत झालेलं आहे. 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page1.txt जर हे विष्णुतत्त्व त्याच्यात पूर्णपणे जागृत झालेलं नसेल तर सहजयोग जरा कमी प्रतीचा होतो. आता ही विष्णुशक्ती आपल्या सर्वांच्या पोटात आहे आणि विष्णुशक्तीनी धारणा होते. आपल्यामध्ये धर्माच्या इतक्या विकृत कल्पना आलेल्या आहेत, तशा त्या नसून अत्यंत शाश्वत आणि सनातन आहेत. त्या काही कल्पना नाहीत, पण वास्तविकता आहेत. म्हणजे कार्बनच्यात जर चार अणुभार आहेत तर त्या सर्व कार्बनला चारच अणुभार असणार जर सोन्याचा रंग पिवळा आहे आणि तो जर खराब होत नाही तर हा धर्म त्या सोन्याचा आहे. प्रत्येकाला आपला आपला धर्म मिळालेला आहे (विंचू, साप) तो विष्णुशक्ती म्हणून आहे. हा धर्म उजळत उजळत आज मानवस्थितीत आलेला आहे. मानवासाठी दहा धर्म सांगितलेले आहेत. ते दहा धर्म मानव असताना असायलाच पाहिजेत आणि ते जर नसेल, तर तो मनुष्य धर्मातून च्युत होतो. म्हणजे तो मानवच रहात नाही. एक तर तो राक्षस तरी होतो किंवा तो जनावर तरी होतो. मानव राहण्यासाठी ते दहा धर्म पोटात सांगितले आहेत. ही अगदी खरी गोष्ट आहे. आता दहा धर्माचे रक्षण करण्यासाठी एक दूसरी व्यवस्था परमेश्वराने करून ठेवली आहे, ती मानवाला समजत नाही, की आपण ह्या धर्मात राहिले पाहिजे. विष्णुशक्तीमुळे मानव होईपर्यंत स्वत: या संसारामध्ये अवतरण घेतलेलं आहे, आपल्याला माहीत आहे का, परमेश्वराचे अवतार झालेले आहेत, आधी आपण मासळी होता, तेव्हा मासळीरूपाने झालं आहे. मग कूर्मरूपाने (कासव) झालेले आहेत. कासवानंतर मग वराह रूपाने झालेले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला की स्पष्टरूपाने दिसून येते की, जशी जशी एका प्राण्याची प्रगती होत गेली तसा तसा परमेश्वराने स्वतः या संसारामध्ये जन्म घेतला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय मार्गदर्शन कोण करणार? आणि विष्णुशक्ती हीच फक्त अवतरण घेत असते. बाकीच्या कोणत्याही शक्त्या घेत नाहीत. त्याचं कारण असं आहे की अवतरणाची गरज उत्क्रांतीसाठी होत असते. आणि उत्क्रांतीसाठी जर आहे तर उत्क्रांतीचे कार्य हे विष्णुशक्तीमुळे होते. आणि विष्णुशक्तीच नेहमी अवतार घेत असते. त्यातल्या त्यात आपण जिला महाकालीची शक्ती म्हणतो किंवा जिला आपण शिवशक्ती म्हणतो ती सुद्धा अवतार घेते. जेव्हा भक्तावर काही संकटे येतात तेव्हा देवींनी अनेकदा ह्या संसारात येऊन म्हणून आपल्या छत्रछायेने त्या भक्तांना संरक्षण दिलेले आहे. तेव्हा ती सुद्धा अवतरण घेते. पण मुख्य अवतरण जे उत्क्रांतीला मदत करते ते म्हणजे विष्णुशक्तीचे आहे. आता विष्णुशक्तीचा जो पूर्णपणे प्रादर्भाव झालेला आहे, असं जे अवतरण आहे ते कृष्णाचे आहे. म्हणून त्याला संपूर्ण अवतरण असं म्हणतो. इतकंच नव्हे तर तो विराट आहे समजा जर हे विश्व विराटाचे आहे तर तुम्ही त्याच्यातले एक लहान पेशी आहात. ह्या पेशी आहेत, ह्या जागृत झाल्या पाहिजेत आणि ह्यांना कळलं पाहिजे की, ते एक संपूर्ण अवयव आहेत, भाग आहेत. आणि म्हणूनच आज इथे सहजयोग आपण करत आहोत. आता मनुष्य विशुद्धी चक्रापर्यंत आला. हे चक्र श्रीकृष्णाचे आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सोळा पाकळ्या त्याच्यात आहेत. आणि सोळा हजार नाड्या आहेत. त्या श्रीकृष्ण स्थितीला आल्यावर मानवाने आपलं डोकं वर केलं. त्याच्यातूनच मानव हा एक विशिष्ट तऱ्हेचा प्राणी झाला. आणि त्याचे वैशिष्ट्य हे की त्याला 'मी' पणा आला. मी म्हणजे अमूक. हे जे त्याचे प्रत्येक घटक वेगवेगळे करणे आहे, ह्या प्रत्येक घटकाला जे परमेश्वराने वेगळं करून टाकलेले आहे, ते एका विशेष क्रियेमुळे घडतं की, आपल्यामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार दोन्ही वाढले आणि जेव्हा ह्या ब्रह्मरंध्राच्या जवळची ही जागा आहे. इथे जेव्हां ते येऊन मिळतात आणि एकावर एक पडून जातात, तेव्हा तिथे स्वस्तिक संतुलन होते. जमा होते. जमा झाले की टाळू भरते. टाळू भरली म्हणजे तुम्ही सगळे वेगळे झालात. मग तुम्ही मानव झालात. अशा रीतीने आता हे जे अ, ब, क, ड सगळे लोक तयार झालेले आहेत, हे स्वत:ला वेगळे वेगळे समजतात. आम्ही वेगळे , तुम्ही वेगळे, ते वेगळे आहेत, पण खरोखर तुम्ही वेगळे नाहीत. तुमच्यात एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीला प्राप्त झाल्याशिवाय ते परत तुमच्या डोक्यात तरी कसे येणार? म्हणून परमेश्वराने तुम्हाला आधी वेगळे केलेले आहे. 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page2.txt मानवाला मात्र परमेश्वराने स्वातंत्र्य दिले. तुम्हाला वेगळे केलेले आहे, की आता तुम्ही थोडे स्वत: शिका. स्वत: शिकल्यानंतर मगच तुम्ही जाणू शकाल, की तुम्ही त्या सबंधाचे एक अवयव आहात किंवा एक घटक आहात आणि हा जो घटक आहे तो जेव्हा जागृत होऊन त्याच्याशी एकाकार होईल तेव्हाच त्याला आपलं पूर्णत्व प्राप्त होणार आहे. त्यांनी माणसासाठी केलेले आहे आणि त्यासाठी, हे कार्य होण्यासाठी कुंडलिनी ही शक्ती, जी की शिवशक्ती स्वत:वर उठून ब्रह्मरंध्रातून छेदून वर येते, त्या वेळेला हा साक्षात्कार घटित होतो, ह्याला कोणताही दुसरा मार्ग नाही. कोणी जर सांगितलं की एकच मार्ग कसा? एकच मार्ग आहे. झाडाला अंकुर येणं हा एकच मार्ग आहे. तसाच मनुष्याची कुंडलिनी जागृत होणं हा एकच मार्ग आहे. आता इतर धर्मात याबद्दल सांगितलं आहे की नाही वगैरे पुष्कळ ऊहापोह होतात. पैकी तुम्ही जर ख्रिश्चन धर्म बघितला तर त्यांच्यात नाना तऱ्हेने कुंडलिनीचे वर्णन केलेले आहे. श्री ख्रिस्ताने असं म्हटलं आहे की, 'मी दरवाजा आहे' व 'मी रस्ता आहे' याचा अर्थ असा की श्री ख्रिस्त स्वत:च कुंडलिनीच्या मार्गातील दरवाजा आहे व रस्ता आहे. पण त्यांनी कुंडलिनी हा एक शब्द वापरला नाही;B नंतर मुसलमान धर्मामध्ये कुंडलिनीबद्दल म्हटलं आहे की नाही असं जर विचारलं तर मी म्हणेन सगळं कुंडलिनी तत्त्व आहे. नमाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पण कुंडलिनी वर कशी करायची हे त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. पूर्वी जेव्हा महंमदसाहेब होते तेव्हा त्यांनी सांगितले की आपले दोन्ही हात पसरून गुडघ्याच्या सहाय्याने तुम्ही नमाज करा. तेव्हा लोक हसत होते की हे कशाला करायचे. त्यांच्याशी कुंडलिनीच्या गोष्टी आजसुद्धा आपण करू शकत नाही. मग तेव्हाची तर गोष्ट वेगळीच. स्वत: ते महंमदसाहेब दत्तात्रयाचे अवतरणच होते. पण दत्तात्रयांची इथे काय स्थिती होती ते अगदी बघण्यासारखे आहे. म्हणून त्या लोकांनी समजून घेतलं नाही. तरीसुद्धा त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जरा मुसलमानांचे नमाज पहा. आता नमाजचे जेवढे काही प्रकार आहेत ते सबंध चक्रांना गती देणारे आणखी कुंडलिनी जागृत करणारे आहेत. तर ही जी दुसरी शक्ती आहे, विष्णुशक्तीच्या रूपाने आपल्यामध्ये वास करत असते त्याला हे जे गुरू लोक आहेत, म्हणजे दत्तात्रयाचे जे रूप आहे ज्यांना आपल्या महाराष्ट्रात आपण फारच मान देतो, हे सगळे पोटामध्ये विराजित आहेत. त्याची तत्त्वे झाली पाहिजेत. पुष्कळ लोक जागृत दत्तात्रयाचे भक्त आहेत. पण सगळ्यांची पोटं खराब आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही दत्तात्रयांचे शिष्य म्हणजेच तुमचे पोट अत्यंत उत्तम असायला पाहिजे तर तुमचे पोटच खराब असणार. दत्तात्रयाला आळवायला बसले. दत्तात्रय काय घरातले नोकर नाही. दत्तात्रय म्हणजे काय ? ते आम्हाला माहीत आहे, म्हणून त्याचे वर्णन देखील आम्ही करू तुमच्या शकत नाही. तेव्हा एवढ्या मोठ्या तत्त्वाला तुम्ही आवाहन करता, त्याच्यासाठी तुमची तयारी आहे कां? परत तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? ही अनाधिकार चेष्टा केल्यामुळे गुरूसुद्धा ह्याच्यात भामटे बसवले आहेत, पुष्कळसे गुरू नुसते भामटे आहेत. त्यांना दत्तात्रयाचे नावसुद्धा घ्यायचा मुळीच अधिकार नाही. परत ते असे सर्व अनाधिकारी गुरू दुर्गतीला जातात, पण तुम्हालाही मात्र दुर्गतीकर त्यांनी येते आणि अशा रीतीने तुम्ही जे दत्तात्रयांचे तत्त्व स्वत:मध्ये जागृत करायचे ठरविले, त्यामध्ये अत्यंत दोष आहेत. आणि ह्या दोषांमुळे पोटामध्ये त्रास वरगैरे होतात. आता सहजयोगानंतर तुमच्या लक्षात येईल की काय दोष आहेत ? त्याचं अद्वैत कसं साधायचं? आणि कशा रीतीने आपल्यातले दत्रात्रेय जागृत करून घ्यायचे. एकदा दत्तात्रेय आपल्यामध्ये जागृत झाले की मग धर्म आपोआप बसतो. अधर्म करणे मोठे कठीण जाते. आता मुख्य म्हणजे ह्या गुरू लोकांनी काय सांगितलेले आहे, ते आपण लक्षात घ्या. पहिली मुख्य गोष्ट म्हणजे मानवाला कोणतीही नशेची गोष्ट नसावी. कोणी म्हणतात की साईनाथ चिलीम पीत होते. अहो, ते तुमच्या नशा घालविण्यासाठी पीत होते. त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही नशा करायची नाही. कोणतीही नशेची गोष्ट, मग ती तंबाखू असो किंवा दारू असो, त्याच्या विरोधात सदैव आता दारू का प्यायची नाही? त्यांनीच आपल्या धर्माला किंवा गुरूतत्त्वाला त्रास होतो. विष्णुतत्त्वाला पोषक हे गुरू आहेत. परत कट्टरपणा धर्मांधता ह्या सर्व गोष्टी आपल्या नाभी चक्राला नुकसानकारक ठरतात. आता आपल्यामध्ये जर कट्टर लोक असतील तर हमखास त्यांना पोटाचा त्रास होईल. कट्टरतेने त्यांना भयंकर पोटाचा त्रास होणार आहे. कारण कट्टरता ही विष्णुतत्त्वाला फार हानीकारक 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page3.txt आहे. इतकेच नव्हे तर गुरूतत्त्वसुद्धा त्यांच्यामध्ये नुकसान पावते, म्हणून ज्या माणसामध्ये कट्टरता आहे म्हणजे आम्ही मोठे लागून आलो. हिंदू किंवा ब्राह्मण, ख्रिश्चन किंवा मुसलमान, असे कट्टर म्हणवणारे लोक सहजयोगाला पावू शकत नाहीत. तुम्हाला काय माहीत? तुम्ही आज इथे जन्माला आलात, उद्या मुसलमान धर्मात आला असता तर, किंवा चायनामध्ये जन्माला आला असता तर? कशावरून तुम्ही ठरवलत तुम्ही हेच आहात म्हणून? हिंदुस्थानात तरी तुम्ही असे म्हणू शकत नाही. भारतीय असून, हिंदू असून म्हणू शकत नाही कारण सांगितलेले आहे की, तुमचे पुनर्जन्म आहेत. जर तुमचे पनुर्जन्म आहेत तर तुम्ही पूर्वजन्मी कोण होता काय माहिती? कदाचित पूर्वजन्मी तुम्ही इंग्रज असाल आणि जे इथे मोठे साधुसंत ते आता इंग्रज म्हणून जन्माला आले असतील आणि तिथूनच एखादे वेळेला तुम्ही इथे आला असाल. आजकालचे पुढारी पाहिले की, मला अशी शंका वाटू लागते की, ते इथे आलेत की काय जन्माला? आणि त्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे की, आपण धर्माबद्दल बोलतो, तेव्हा बाह्य धर्मापेक्षा आतल्या धर्माकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याची अनेक उदाहरणे आपल्यामध्ये दाखविण्यासाठी आहेत. विशेषतः आपल्या अवतरणांनी दाखविले आहे. उदाहरणार्थ रामाचेच घ्या की एक भिल्लीण, तिचे दात तुटलेले, म्हातारी, अंघोळीला वंचित झालेली, दात घासले नसतील, अगदी म्हातारी जख्खड बाई. तिने बोरे फोडली आणि तोंडात घालून उष्टी केली. तुम्ही एकतरी खाल का? विशेषत: आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर फारच वावडे उष्ट्याचे. पण इतक्या प्रेमाने रामानी ती खाल्ली. सीतेला म्हणाले की, 'मी तुला एकही देणार नाही. सगळी मीच खाणार आहे. ' तिने म्हटलं, 'असं काय, सगळी आपणच खाणार.' मी म्हणे अशी बोरं कधी खाल्लीच नाही, मला अशी चव कधी आलीच नाही, तर मी हे का तुला देऊ? तर मग ती भिल्लीण म्हणते, 'नाही, नाही, माझ्याजवळ आहेत न तुमच्यासाठी, पण मी दातांनी तोडून ठेवलेली आहेत.' मग त्यांना दिली मग लक्ष्मणाला राग येत होता की हा काय प्रकार आहे ? त्याला नाही समजलं, हा काय प्रकार ? सीतेने सांगितले खरं आहे, मी कधी जन्मात अशी बोरं खाल्ली नाहीत. थोडी असली तर मला द्या. माझ्या दिराला पण द्या. मग अगदी धावून लक्ष्मणाने घेतली ती बोरं असं सुंदर वर्णन केलंय. विदुराच्या घरी जाऊन जेवले श्रीकृष्ण. स्वत: गवळी जातीत त्यांनी जन्म घेतलेला होता. मग आम्ही कोणीतरी मोठे शिष्ट आहोत, असं मानायचं म्हणजे तुम्हाला हिंदूधर्म मुळातून अगदी समजला नाही, हे दिसून येते. सर्व माणसामध्ये एकच आत्मा आहे. आणि सर्व माणसे एकाच आत्म्याच्या भोवती फिरत आहेत. एकच परमेश्वर सगळ्यांच्यामध्ये नांदतो, हे अनेकदा जरी सांगितलं असलं तरी आपण जाती-पाती करून ठेवल्या आहेत. जाती- पाती ह्या मनुष्याच्या स्वभावामुळे असतात आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो तेव्हा ही फार आतली गोष्ट आहे. 'स्व' भाव त्या 'स्व' ला अजून जाणलं नाही. तुम्ही जाती कशा कराल ? अशाच प्रकारे हे आपल्यामधील विष्णुतत्त्व खराब होते. म्हणजे आधीपासून आपल्या कल्पना करून घ्यायच्या की हे ठीक नाही ते ठीक नाही, तुम्हाला कसं कळलं? हे कसं तुम्ही ओळखणार? त्याच्यासाठी आधी तुमच्यामध्ये विष्णुतत्त्व जागृत व्हायला पाहिजे. ते तुमच्या नाभीचक्रात आहे. नाभी चक्रातलं विष्णुतत्त्व जर जागृत झालं तर त्याच्यापुढे स्वाधिष्ठान चक्रावरती मी आपल्याला काय सांगितलेले आहे की ही क्रियाशक्ती स्वाधिष्ठान चक्रावर चाललेली आहे. तेव्हा ज्या लोकांना अती कर्म करायची सवय लागलेली असते त्या लोकांना स्वाधिष्ठान चक्राचा फार जास्त त्रास होतो. कारण सगळी शक्ती विष्णुतत्त्वातून ती स्वाधिष्ठान चक्रात ओढत असतात. जो अतिकर्मी मनुष्य असतो त्याला वेळच नसतो की माझी उत्क्रांती झाली पाहिजे, की मी काहीतरी करून , माझ्यातून विशेष निघालं पाहिजे. मला काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. त्याचा तिकडे विचारच नसतो. सगळा वेळ तो आपली परमेश्वराने दिलेली जी शक्ती आहे ती ओढत असतो. आणि म्हणूनच आपण पाहिलेले आहे की अशा लोकांना सारखे वरचेवर रोग होतात. आता ही शक्ती विष्णुशक्ती आणि शिवशक्ती आहे तर विष्णुशक्तीतूनच ही सहा चक्र वरती निघालेली आहेत. आणि ह्या सहा चक्रांमधून म्हणजे स्वाधिष्ठान चक्रसुद्धा विष्णुशक्तीतूनच निघालेले आहे. जेव्हा ही कुंडलिनी हे सर्व छेदून वर जाते तेव्हा ती संपूर्ण शुद्ध विद्या म्हटली पाहिजे. किंवा जे शुद्ध तत्त्व आहे, 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page4.txt परमेश्वराच्या इच्छेने ते त्याच्यातून छेदून जातांना जागृत करून जाते . म्हणजे आपल्यामध्ये बसलेले जे काही सुप्त देव आहेत जे अजून प्रज्वलित झालेले, ते जागृत होतात. ते जागृत झाल्याबरोबरच ह्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतात. लक्ष्मीतत्त्व जागृत झाल्याबरोबरच आपल्याला माहीत आहे की, लक्ष्मीचे काय अंग असते ते. लक्ष्मी म्हणजे अती श्रीमंत मनुष्य नाही. पैसेवाला नाही. लक्ष्मी म्हणजे एका हातातून दान असायला पाहिजे. एका हातातून आश्रय असायला पाहिजे. दोन हातामध्ये कमळ असायला पाहिजे. जो कंजूष आणि कद्रू मनुष्य आहे तो लक्ष्मी तत्त्वाला मुळीच अजून प्राप्त झालेला नाही. जो मनुष्य कमळासारखा अत्यंत प्रेमळ आणि ज्याच्या घरी कोणीही जावे. म्हणजे इतका की भुंगा इतका काटेवाला तो जरी आला तरी कमळ त्याला कसं अगदी सांभाळून घेतं, असा जो करील तोच मनुष्य आपल्याकडे खरा लक्ष्मीपती मानला जातो, पण आपल्याकडे असे किती लक्ष्मीपती आहेत ? नाहीतच म्हटलं तरी चालेल. लक्ष्मीपती ज्यांना आपण म्हणतो ते खरं म्हणजे जे खूप पैसेवाले आहेत, गाढवावर पैसे लादावेत अशा तऱ्हेचे लोक आणि अशा लोकांना काहीही धर्म कधी मिळणार नाही. श्री.ख़िस्तांनी सांगितले आहे, की ज्या माणसाजवळ अती पैसा आहे, तो कधीही प्रभूच्या साम्राज्यात येऊ शकत नाही. एक वेळेला एक उंट तुम्ही घातला एका सुईच्या भोकातून तो जाऊ शकेल, पण असा मनुष्य जाऊ शकत नाही. त्याला कारण हे की अशा माणसाला सगळा पैसाच दिसतो. दसरं काहीच दिसत नाही. आपले आईवडील दिसत नाहीत, भाऊबहिणी दिसत नाहीत, बायको दिसत नाही. काही दिसत नाही. मी किती मोठा, माझ्याजवळ एवढा पैसा आहे, पण एकदा तो पैसा हरवला की मग त्याच्या लक्षात येतं, की तो कुठे गेला. अती पैशाचे पण आपल्याला माहीत आहे, की त्यामुळे मनुष्याला थेरं सुचतात, की तो आता कुठे खर्च करायचा? जरी पैसा जेमतेम असला, तरी ज्यांनी आपल्याला समाधान मिळतं ती विष्णुशक्ती जर आपल्यामध्ये जागृत झाली, तरच मनुष्याची पुढे प्रगती होऊ शकते. म्हणजे त्याचे चित्त पैशाहन समाधानावर आल्यावरती मग तो पुढच्या मार्गाला लागतो. पण समाधानच जर पैशातून आलं नाही, म्हणजे असं आहे, की आम्हाला वाटलं एक घर बांधावं तर घर बांधू, घर बांधल्यावरती मग वाटेल की आता मोटर घ्यावी, मग आम्ही मोटर घेऊ. मोटर घेतल्यावरती आम्हाला वाटेल बिल्डिंग घ्यावी. काहीतरी सारखं चालत राहणार. म्हणजे कधीही आपल्याला समाधान नाही मिळणार. पण हे जडत्व, स्थूल आहे. ही वस्तू आहे. त्या वस्तूपासून मानवाला कधीही समाधान होणार नाही. ही जड वस्तू आहे. जडतेने आपल्याला फक्त जडता येते. जडतेने समाधान येऊ शकत नाही. समजा एखाद्याला खु्चीची सवय झाली मग जमिनीवर बसू शकत नाही, म्हणजे खुर्ची चिकटली त्याला. म्हणजे सर्व जडता आहे जी माणसाला सवय लावते. कोणत्याही गोष्टीची सवय जी जडतेची लागते. तर त्या सवयीमध्ये माणूस हळूहळू विरघळून त्याचे जे काही सत्त्व आहे ते नष्ट होते. कोणत्याही जड वस्तूनी माणसाला समाधान मिळू शकत नाही. फक्त परमेश्वरी तत्त्वानेच येऊ शकते. जोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्यातून प्लावीत होत नाही, प्रस्फुटीत होत नाही, स्तंभीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान कधीही मिळणार नाही. तुम्ही वाटेल तितके पैसे कमवून बघा, वाटेल त्या सत्तेवर तुम्ही जाऊन बघा, पण तरी तुमचा चेहरा नेहमी सुतकीच राहील. पण असा एखादा बादशहा मनुष्य की जो काहीही नसतांना मजेत असतो. कुठे झोपवलं तरी मजेत असतो. अशा माणसाला पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की ही जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये तृप्त झाली आहे. आता काहीतरी पुढचे पाहिले पाहिजे. आता काहीतरी दुसरं असायला पाहिजे. हे जे झाले हे समाधान झाले. फार झालं आता. आता आणखी नको हे प्रपंच फार झालेत, आता ह्याच्यापुढची पायरी काय? तर तेव्हा मनुष्य धार्मिकतेला जागृत होतो मग त्याच्यातही मनुष्याचे डोके बाहेर येते. पहिले एक ब्राह्मण बोलवायचा, मी तुला दोन पैसे देतो, तू पूजा कर. प्राप्ती लावायची किंवा फार तर एखाद्या देवळाला शे-पाचशे रुपयांची देणगी दिली. वा, वा आम्ही देणगी दिली. नाहीतर एक देऊळ बांधून टाकायला हरकत नाही. ह्या देवळाचं काय होणार आहे ? तुमच्या देवळाची काय स्थिती आहे ? इकडे आहेत की नाही देव स्वत: मध्ये? इथले देव तुम्ही जागृत केलेत की नाही? तुमच्यामध्येच बसलेला आत्मा आहे. मग तुम्ही त्याला का नाही जागृत करत ? कारण असं आहे, की माणसाला 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page5.txt स्वत:ला बघायचं म्हणजे मोठा त्रास. तो स्वत:ला बघू शकत नाही. आणि त्याच्यासाठी कुंडलिनीची व्यवस्था आहे. ही कुंडलिनी एकदम उठते आणि वर येते ते का ? सगळेच्या सगळे देव जागृत होतात. आता पुष्कळांना असं वाटतं की, कुंडलिनी जागरण म्हणजे मोठं कठीण काम आहे. पण तसं नाही आपण आता पाहिलतच. किती सोपं आहे. काल किती लोकांना पार केलं? काल किती लोकांच्या हाताला थंड लहरी 'सौंदर्य लहरी' आल्यात. हे अत्यंत सोपं काम आहे. पण हे ज्याला जमतं तोच करू शकतो. ज्याला हे जमत नाही त्यांनी त्याच्यात पडू नये. अधिकार चेष्टा करू नये. ज्याला ह्याचा अधिकार आहे, त्याच्यासाठी ही सबंध लीला आहे आणि जेवढं काही महत्त्वपूर्ण आहे, तेवढं सोपं असायला पाहिजे. तर आता ही जी शिवशक्ती तुमच्यामध्ये डावीकडे आहे, ही शिवशक्ती सदाशिवाच्या आणि आपल्या इथे सुद्धा विराजित आहे असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये आत्मा आणि शिवशक्ती दोन्ही आहेत. त्या स्थितीमध्ये. तिथे जेव्हा जाऊन ही कुंडलिनी ब्रह्मरंध्राला छेदते, तेव्हा तो प्रकाश सगळीकडे पडतो आणि तुम्ही एका नवीनच अवस्थेमध्ये उतरता. एका नवीन आयामात उतरता. तुमच्या चेतनेला एक नवीन रूप मिळते. म्हणजे तुमच्या चेतनेमध्ये एक प्रज्वलितपणा येतो. 'प्र' शब्द जो आहे तो ह्याच्यात बरोबर वापरण्यासारखा आहे. 'प्र' म्हणजे प्रकाशित झालेला . आत एक दीप आहे. तो पेटलेला नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. तो पेटवल्याबरोबरच तो प्रज्वलित झाला तसेच तुमचे चित्त आहे ते प्रज्वलित होते त्यामुळे प्रकाश पडतो. प्रकाशामुळेच तुम्हाला सगळं दिसायला लागतं. आता तुम्हाला काही दिसत नाही अलख आहे, अपरोक्ष आहे, वगैरे-वगैरे लोक बोलतात आणि त्यामुळे तुम्हाला समजत नाही. ह्याला इलाज काय? इलाज आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्काराशिवाय तुमची अविद्या जाणार नाही आणि ते हे घटीत झालंच पाहिजे. ते परमेश्वराचे कार्य आहे. त्यांना हे कार्य करायलाच पाहिजे. त्यांनी हे संसाराचे सुंदर स्वप्न रचलेलं आहे. आणि त्यांची ही रचना जर फलद्रप झाली नाही तर परमेश्वरालाच अर्थ राहणार नाही. तेव्हा त्यांना हे कार्य करावे लागेल आणि ते कसं करायचं ते त्यांना माहीत आहे. पुष्कळसे लोक म्हणतात-'आम्ही माताजी शिवजीचे भक्त' त्यामुळे हृदयाचा त्रास त्यांना. अगदी खरी गोष्ट आहे की, शिवाचे भक्त म्हणजे नक्कीच हृदयविकार ! अनाधिकार चेष्टा केल्यामुळे जर शिवशक्ती रागावली तर शिवशक्ती जी आहे, ती तुमच्या अस्तित्वाला कारणीभूत आहे. तुमचे अस्तित्वच नष्ट होणार. म्हणून तुमच्या हृदयाचा त्रास पण त्याला पर्याय आहे. तर काय करायचं? क्षमा मागायची. शिवाकडे आपण क्षमा मागितली पाहिजे. फार सोपी गोष्ट आहे. शिवाला सांगायचं आमचं चुकलं, तू करुणासागर आहेस, दया सागर आहेस. तू आम्हाला क्षमा कर. आता आम्ही नीटपणाने चालणार आहोत. इथून तिथून या महाराष्ट्रात इतके गुरू आहेत, त्यातले फार तर दोन चार खरे गुरू झालेले आहेत. बाकी सगळे अगदी भामटे आहेत. आणि त्यांचे मारे फोटो घरात ठेवलेले आहेत. आणि सांगून ठेवते आता कलीयुग संपलेले आहे आणि सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे. त्या गुरूंच्यामुळे तुम्हाला ल्युकेमियाचा, कॅन्सरचा रोग होणार आहे आणि सहजयोगाशिवाय हा ठीक होणार नाही आणि त्यामुळे आता लक्षात ठेवा. जर तुम्ही अशा गुरूंची आणि घाणेरड्या लोकांची सेवा केली, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे एक आईच्या प्रेमाने अत्यंत आतून करुणेने सागंत आहे. सहजयोगाने तुमच्यात प्रकाश येईलच. आणि त्या प्रकाशाने तुम्ही जाणणार की, बाहेर किती खोटे काम चाललेले आहे. आणि हा खोटेपणा किती बळावलेला आहे. या धर्मांधतेने आणि अशा रीतीच्या देवळात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन काय आपलं आयुष्य अगदी बरबाद करून घेत आहेत. त्याला काहीतरी मार्ग द्या, त्याला काहीतरी प्रकाश द्या. हे मानवाचे शरीर तुम्हाला माहीत नाही, परमेश्वराने किती मेहनतीने बनवले आहे. कितीतरी योनीतून तुम्हाला काढून या स्थितीत आणलेलं आहे तेव्हा ही स्वतंत्रता आपण वापरली पाहिजे. आपण कोण आहोत? परमेश्वराने आपल्याला कोणत्या स्थितीतून इथे आणलंय? किती प्रेमाने, किती संगोपन करून आज आपली त्यांनी इतकी सुंदर स्थिती केलेली 19790924_Kundalini ani Shri Shivshakti_Mumbai_M_TC.pdf-page6.txt आहे. ह्या इतक्या सुंदर झालेल्या आपल्या मानव देहाला, आपल्या मनाला आणि ह्या सबंध मानव व्यक्तित्वाला कोणकोणत्या स्थितीला आणलंय. कुूठे बसवलेले आहे ह्याचा विचार करावा. स्वत:ची मान्यता झाली पाहिजे. एक बाणा असायला पाहिजे माणसामध्ये समजण्याचा की, आम्ही कोण? कुठे जाणार? आम्हाला काय हवंय ? तेव्हा तुम्ही आपले या आणि स्वत:चं कल्याण करून घ्या. त्या गुरूंच्या मागे उगीचरच तुम्ही स्वत:ला त्रास करून घेऊ नका. आणि 'स्व' ला प्राप्त झाल्यानंतर ह्या गुरूपासून कशी सुटका करायची ते शिकून घ्या. पण त्यांच्याशी वाद घालायला जाऊ नका. भांडायला जाऊ नका. ते तुमच्या हृदयात वसत नाही. ते तुम्हाला जमायचं नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि तिथे जरी तुम्ही कितीही बलवत्तर असाल, पण तरीसुद्धा हे लोक अत्यंत दष्ट असतात आणि त्यांच्यात इतक्या घाणेरड्या विद्या असतात आणि इतके पतित असतात! तेव्हा मला वारंवार सांगायचय की, अशा लोकांच्या मागे तुम्ही जरी गेले असाल तरी सहजतेतच तुम्ही त्यांना सोडलं पाहिजे. जर तुम्ही ते सहजतेत सोडून दिलं तर त्यानी फारच लाभ होण्यासारखे आहे. कधी कधी या गुरूचे प्रकार बघून मला इतका त्रागा वाटतो, इतका क्रोध येतो की, कधी कधी वाटतं जर संहार शक्ती वापरली तर याचा सहज संहार परमेश्वर करू शकतो पण संहार करून तरी काय करणार ? कारण कलीयुगामध्ये अशी स्थिती आहेच आहे की, 'यदायदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत' झालेला आहे. परंतु ह्या जगामध्ये असे साधू कोण आहेत ? 'परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्' दुष्कृतांच मुख्य आहे, साधूंमध्ये तेव्हा ह्यांच्या डोक्यात घुसलेले आधी काढायला हवे, तेव्हाच त्यांना पार करता येईल. अत्यंत नाजूक स्थिती आहे. मला दिसतयं की तुमच्या दुष्कृत्य मेंदमध्येच ते घुसलेले आहे. तेव्हा काढायला पाहिजे. ते स्वच्छ करायला पाहिजे. ते व्यवस्थित काढून तुम्हाला तुमच्या ठिकाणी द्यायचंय आणि तुमची जी संपदा आहे ती तुमच्यात बसवायची आहे.